ताज्या घडामोडीब्रेकिंग

चला अक्षरगणेशा रेखाटूया, विद्याथ्र्यांना मदत करुया

गणेश तडसे
सातारा प्रतिनिधी

आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन 22 आॅगस्ट रोजी होत आहे. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, विधायक, आरोग्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. याला प्रतिसाद म्हणून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्रस्टच्यावतीने यंदा एक अक्षरगणेश कलाकृती विद्याथ्र्यांसाठी असा नावीण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. . अक्षरगणेशा उपक्रमाचे यंदा हे चैथे वर्ष आहे. या उपक्रमातून जमलेली रक्कम हुशार, गरजू विद्याथ्र्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.
सध्या आपल्या नावात अक्षर गणेशाचे रुप शोधण्याचा नवा ट्रेंªड सोशल मिडीयावर हीट होत आहे. तरुणाईची ही आवड आणि लाडक्या गणेशाचे होणारे आगमन लक्षात घेवून इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षरगणेशाचा उपक्रम राबवला आहे. ‘‘चला अक्षरगणेशा रेखाटूया, विद्याथ्र्यांना मदत करुया’’ अशी टॅगलाईन ठेवत सर्वाना या उपक्रमात सहभागी होण्याचेे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्याला हव्या असलेल्या नावात अक्षरगणेशा डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून रेखाटून घ्यायचा आणि त्याबदल्यात आपण त्यांना कलाकृतीने मुल्य रु. 300/- च्या वरती कितीही आपल्या इच्छेनूसार द्यायचे. सदरचे मुल्य संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक, शाखा – कुंभारगांव, खाते क्रमांक – 0625104000046844, आयएफएससी कोड – 0000625, कस्टमरआयडी क्रमांक – 83312906 या खात्यावर आॅनलाईन जमा करावे किंवा 9764061633 या क्रमांकावरती गुगल पे करावे. अक्षरगणेशांना मिळणारे मानधन गरजू विद्याथ्र्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
आतापर्यंत कलेच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनला रु.35 हजार,  केरळ पुरग्रस्तांना रु.21 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये रु.4 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.3 हजार, ‘भारत के वीर’ या खात्यात रु.1,111/- चा निधी देण्यात आला आहे.
 याशिवाय लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य गरजू विद्याथ्र्यांना दिले आहे. संदीप डाकवे आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमांचे विविध क्षेत्रातील मान्यवर सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे.
तरी जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन डाॅ.संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी  केले आहे. कारण सदर अक्षरगणेशा आपल्याकडे संग्रही राहिलच परंतू आपण रेखाटून घेतलेल्या कलाकृतीचे मुल्य गरजू विद्याथ्र्यांना मदतीचा हात दिल्याचे आत्मिक समाधान कायम आपणास देत राहील हे नक्की.

चैकटीत:
शैक्षणिक क्षेत्रात भरीव मदत
ज्ञानाची शिदोरी उपक्रमातून 28 हजाराचे साहित्य वाटप
माणूसकीच्या वहया उपक्रमातून 16 हजाराचे साहित्य वाटप
एक वही एक पेन उपक्रमातून 11 हजाराचे साहित्य वाटप
अंगणवाडी, शाळा रंगकाम व बोलक्या भिंती
गणवेश वाटप
महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप
स्कूल बॅग व संगणक वाटपात सहकार्य
ग्रंथतुलेतून पुस्तकांचे वाटप
विनामूल्य शाळांच्या बोलक्या भिंती रेखाटन

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »