ताज्या घडामोडी

अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी नदीमध्ये जाणारे रस्ते जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आले.

उपाययोजना कायमस्वरुपी की तात्पुरती याकडे जनतेचे लक्ष

अनिल दराडे
चिखली प्रतिनिधी

दुसरबिड:- अवैध रेती उपश्याला आळा घालण्यासाठी खडकपूर्णा नदीपात्रात जाणारे रस्ते जेसीबीच्या साह्याने खोदुन रस्ते बंद करण्याची कार्यवाही महसुल विभागाच्या वतिने करण्यात आली.
लिलाव न झालेल्या रेती घाटातून रेती माफीचा यांच्या मालकी सारखे असल्याने रात्री व दिवसा राजरोसपणे ट्रक्टर व टिप्परच्या साह्याने रेती उपसा करून अवाच्या सव्वा भावाने विक्री करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. या अगोदर अनेक लोकांनी तक्रारी सिंदखेडराजा तहसीलदार यांच्याकडे दाखल‌ केल्या होत्या. या अनुषंगाने तहसीलदार यांनी एक अनोखा फंडा निवडला तो म्हणजे नदी लागत असनारे घाट व लिलाव न झालेल्या घाट जेथून रेती माफीयांचा अवैध रेती उपसा सूरु आहे अशा ठिकाणी लिगा, पिंपळगाव कुडा, चागेफळ, हिवरखेड, ताडशिवणी, राहेरी, तढेगाव, बारलींगा आशा अनेक ठिकाणी जे सी बी च्या साह्याने रस्ते खोदले आहे.परंतू या ठिकाणी प्रामुख्याने एक प्रश्न असा उभा राहतो की सदरील कार्यवाही फक्त तात्पुरत्या स्वरुपाची आहे की कायमस्वरुपी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदार सावंत साहेब यांच्याशी संपर्क साधला असता रेती माफिया डोकं वर काढत असेल तर ज्या ठिकाणी लिलाव न झालेल्या रेती घाटा मधुन जर रेती उपसा करतांना दिसुन आल्यास महसुल विभागाशी तात्काळ सम्पर्क साधा असे आव्हान तहसिलदार यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »