ताज्या घडामोडी

पाणी साचणारच नाही, असा दावा आम्ही केला नाही – महापौर किशोरी पेडणेकर

श्रद्धा कांबळे
उपसंपादक
मुंबई

मुंबईत आज मान्सूनने दमदार एन्ट्री केली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करताना पाणी साचणारच नाही, असा दावा आम्ही केलाच नाही, असं म्हटलं. सकाळी काही ठिकाणी पाणी साचलं होतं. अंधेरीच्या सबवे, हिंदमाता कायम पाण्याखाली जाणारी ठिकाणंआहेत. सकाळी निश्चित मोठा पाऊस, उंच लाटा यामुळे शहरात पाणी थांबलं होतं, त्याबद्दल शंका नाही. आता सीसीटीव्ही च्या माध्यमातून बघतोय तर तिथे टमाटर पाणी नाही आहे, पाण्याचा निचरा झाला आहे, असं महापौर म्हणाल्या.

पाणी भरणार नाही असा कधीच दावा केला नाही आणि आम्ही करणार नाही. पण पाणी भरल्यानंतर चार तासात निचरा झाला नाही तर केलेल्या काम हे बरोबर नाही असं आम्हाला देखील बोलायला पुष्टी मिळते. त्याचवेळेला उंच लाटा, त्याचवेळेला मोठा पाऊस, दरवाजे बंद, उलर वॉटर टेबलमधून देखील पाणी बाहेर येतं. भरतीच्या वेळेत पाणी साचणार, कारण ते बाहेर सोडता येत नाही. कोणी म्हणत असेल, पाणी साचतं तर ४ तासाहून जास्त काळ पाणी तुंबलं नाही, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

मी आढावा घेतलाय १९५ मिली, १३७ मिली पाऊस झालाय. ९५ मिली पाऊस झाल्यास खालून पाणी डायव्हर्ट होतं. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. मुंबईत पाणी भरणारच नाही, असा दावा कोणीच केलेला नाही. पूर्वी २ ते ५ दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तसं होत नाही आहे. आम्ही सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहोत, असं महापौर म्हणाल्या.पुढे बोलताना, निष्काळजी पणा होत असेल तर कारवाही करू. मागच्या वर्षीपासून आपल्याकडे मनुष्यबळ कमी झालं आहे. पण ते कारण सांगून आम्ही पळवाट काढणार नाही. आम्ही पाणी जास्त साचणार नाही याची काळजी घेऊ, असं महापौर म्हणाल्या.

विरोधकांना आरोप करायचे आहेत, ते करूद्यात आम्ही उत्तर देत बसणार नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, ते सांगतील ते ही बघून काम करू. हिंदमाता मधील टाक्यांचं काम बाकी आहे. कोरोनामुळे तर लवकर करता आलं नाही. पण येणाऱ्या ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असं महापौर यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी रेल्वे रुळावर पाणी साचण्यावरून भाष्य केलं. रेल्वे अधिकारी देशात फारसे समन्वय साधत नाहीत, त्यांच्या भागात जाऊन आम्ही कचरा साफ करतोय. करी रोड डीलाई रोड इथे पाणी भरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. रेल्वेने काम पूर्ण करायला हवेत. नाहीतर आम्हाला तिथे काम करण्याची परवानगी द्यावी. आमचे सगळे खासदार या गोष्टीवर रेल्वेशी बोलत असतात, त्यांच्या यंत्रणेशी आमचं टायप व्हायला हवं. MMRDA, रेल्वे, आणि इतर प्राधिकरण मुंबईत आहेत, त्यांच्यामुळे आमच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमचं काम करतो, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »