ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिना निमित्त सफाई कामगारांना कोरोणा सुरक्षा कीटचे वाटप

विशाल गवई
तालुका प्रतिनिधी
चिखली
7083304124

चिखली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त चिखली नगर परिषद अंतर्गत चिखली शहरांमध्ये साफसफाई करणारे सर्व सफाई कामगारांना कोरोना सुरक्षा किटचे वाटपाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखलीच्या वतिने करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाटील विधानसभा अध्यक्ष विशेष उपस्थिती गजानन वायाळ तालुकाध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश शिंगणे नगरसेवक प्रमुख उपस्थीतीत रविंद्र तोडकर शहर अधयक्ष व शेखर बोंदे जिल्हा अध्यक्ष यूवक रा.काॅग्रेस हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर तसेच सर्व धर्म समभाव जोपासून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समाज हितासाठी अविरत कार्य सुरु आहे तसेच पक्षाच्या वतीने केलेल्या कार्यावर डॉक्टर प्रकाश शिंगणे नगरसेवक यांनी आपले विचार मांडले यावेळी मान्यवरांचे समयोचित मार्गदर्शन झाले तसेच सर्व मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते कोरोणा सुरक्षा किटचे वाटप नगरपरिषद चिखली येथील सर्व सफाई कामगारांना करण्यात आली यावेळी राजेश खेडेकर पाटील सूभाष देव्हडे प्रशांतभैया डोंगरदिवे विशाल काकडे सदानंद मोरगंजे शेख युसूफ भाई रहीम भाई पठाण प्रमोद चिंचोले नीमराव देशमुख नासिर कुरेशी दिपक कदम निलेश जाटोळ शेख अनिस रोहन सुडगोहर, प्रसाद पवार, हर्ष काकडे, प्रज्वल शहाणे, मयूर पेंढारकर, अभिषेक वैष्णव, दिनेश कोथळकर, चेतन कांबळे काजीम पठाण शिवम तोडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »