ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणाबाबत कोकण विभागीय आयुक्त यांना भारतीय मराठा महासंघा कडून निवेदन

आरक्षण मिळत नसल्यास राज्यभर उग्र आंदोलन करणार बन्सीदादा डोके यांचा इशारा...

जयप्रभा इचके
तालुका प्रतिनिधी पनवेल
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
9082038453

मराठा आरक्षणाबाबत कोकण विभागीय आयुक्तांकडे आज भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रमुख बन्सीदादा डोके यांच्या वतीने विभागीय आयुक्त आप्पासाहेब मिसाळ यांना निवेदन देण्यात आले व इशारा देण्यात आला समाजाला आरक्षण मिळत नसल्यास राज्यभर उग्र आंदोलन सुरू केले जाईल असा राज्यप्रमुख बन्सीदादा डोके यांनी दिला आहे.
कोकण विभागीय आयुक्तांकडे भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख बन्सीदादा डोके, कोकण प्रदेशाध्यक्षा सदानंद भोसले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पालांडे ,नवी मुंबई महिला अध्यक्षा आशाताई शेकदार, पनवेल तालुका प्रमुख प्रथम शेठ पाटील, उरण तालुका प्रमुख संतोष शेठ सामंत व अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »