ताज्या घडामोडी

व्हिटॅमिनच्या गोळ्या खाताना काळजी घ्या

प्रबोधिनी न्युज नेटवर्क टीम

प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना होईल या भीतीमुळे कित्येक लोक स्वत:हून व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ लागले आहेत.ते अत्यंत धोेकादायक आहे.अशा गोळ्यांचे ओव्हरडोस घेण्याने मुत्रपिंडावर दुष्परिणाम होऊ शकतात,असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. नैसर्गिक आहारातून मिळणारी जीवनसत्त्वेच घ्या,असा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.असे लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे,तसेच जीवनसत्त्वे असणार्‍या गोळ्या घेतात; पण ज्यांना कोरोना झाला नाही, असे लोकही प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना होईल,या भीतीने स्वत:हून औषधाच्या दुकानात जाऊन अ, ब, क, ड, ई आदी प्रकारची जीवनसत्त्वे असणार्‍या गोळ्या घेतात.मात्र, हे जर डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतले,तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात.

● व्हिटॅमिन ए चे स्रोत- मासे व माशाचे तेल, दूध, अंडी, गाजर, फळे, पालेभाज्या, रताळे,टोमॅटो,डाळी यातून व्हिटा ए मिळते.

● व्हिटॅमिन ए चे दुष्परिणाम-
व्हिटा ए ची मात्रा जास्त झाली, तर द़ृष्टीमध्ये बदल होणे,हाडे दुखणे,यकृताला इजा होणे,मेंदू वरील ताण वाढणे ही लक्षणे दिसतात. रक्त तपासणी केली तर त्याचे प्रमाण कळते.

● व्हिटॅमिन बी चे स्रोत- मटण, अंडी, दूध, चिकन, दही, डाळी, कडधान्य, सूर्यफूल तेल आदी.

●व्हिटॅमिन बी चे दुष्परिणाम-
अंगावर पुरळ,अपचन,उलटी, सौम्य जुलाब होणे,पायाला मुंग्या, उच्च रक्तदाब,सतत मूड बदलणे.

● व्हिटॅमिन सी चे स्रोत- लिंबू, संत्री, मोसंबी, लिंबू, अननस, पेरू, आवळा, आंबा, पपई, स्ट्रॉबेरी यातून व्हिटा सी मिळते.याचा आहारात वापर करा.

● व्हिटॅमिन सी चे दुष्परिणाम – पाण्यात विद्राव्य आहे. शरीरात साचून रहात नाही.ते लगेच बाहेर पडते.व्हिटा सी वरून घेतले तरीही पचनक्रिया खराब होणे, मुतखडा, हगवण,मळमळ अशी लक्षणे दिसू शकतात.

●व्हिटॅमिन डी चे स्रोत- अंडी, दही, ताक, ज्यूस, चीज, मासे या तून व्हिटा डी जीवनसत्त्व‌ मिळते.त्यामुळे मूळचा नैसर्गिक आहार चांगला असेल,तर या गोळ्या घेणे कटाक्षाने टाळा.

● व्हिटॅमिन डी चे दुष्परिणाम
व्हिटा डी च्या ओव्हरडोसमुळे हायपर कॅल्सेमिया होतो.रक्तात कॅल्शियम प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते.भूक न लागणे, मानसिक तणाव,डोकेदुखी, थकवा,वारंवार तहान लागणे, बद्धकोष्ठता ही लक्षणे त्यांच्यात दिसतात. मूत्रपिंडावरही त्याचा परिणाम होतो.हाडांच्या तक्रारी उद्भवतात. याला व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी म्हणतात.

● व्हिटॅमिन ई चे स्रोत- गहू, सूर्यफूल सोयाबीन तेल, बदाम, शेंगदाणे, बीट, भोपळा,हिरव्या भाज्या.

● व्हिटॅमिन ई चे दुष्परिणाम- रक्त पातळ होणे,डोकेदुखी, मेंदूत रक्तस्राव, उलटी, मळमळ, थकवा आदी लक्षणे दिसतात.

संकलक
श्री.राजेंद्र हरीभाऊ माळी-मंगळवेढा
9028270876

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »