ताज्या घडामोडीब्रेकिंग

राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पदी मुजमिल शेख यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भाटरकर यांनी दर्शविला विश्वास

शरद पुरी
वरोरा प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर ,माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेशवर टेमूर्डे, युवा नेते जयंतराव टेमुर्डे, तालुका अध्यक्ष विशाल पारखी, अविनाश ढेंगळे, जुबेर शेख, शहबाज अंसारी, समीर शेख, राहील शेख यांच्या उपस्थितीत मुजमिल शेख याना जिल्हा सरचिटणीस युवक काँग्रेस पदी नियुक्त करण्यात आले.।सोबतच ओम खिरटकरला विद्यार्थी सेल शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आले.।पद नियुक्तीनंतर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी पक्ष मजबूत व पक्षाच्या हिताचे कार्य करून पदाला योग्य न्याय द्या असे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
नेहमीच गोरगरीबांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे युवा मुजम्मील शेख यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हाध्यक्ष नितीन भाटरकर व समस्त जिल्हा पदाधिकारी यांना दीले असुन आ.ना. शरदचंद्र पवार राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचज गु्हमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले असुन आपल्या नियुक्तीला सार्थक ठरविण्याकरिता पक्षाने दिलेल्या जबाबदारी पुर्णपणे पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत व्यक्त केले.
युवा व्यक्तीमत्व मुजम्मील शेख यांना जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्त केल्यामुळे युवावर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊण त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »