ताज्या घडामोडी

दारू तस्करीत 10 पेटी देशी दारू जप्त

पंकज रामटेके
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
८४८४९८८३५५

सोमवारला सायंकाळी 6 वाजता दरम्यान धानोरा टोल नाक्यावर घुग्घुस पोलिसांनी गुप्त माहिती आधारे सापळा रचून विना नंबरच्या दुचाकीने पोत्यात 10 पेटी देशी दारू घुग्घुस मार्गे चंद्रपूरच्या कडे जात असतांना आरोपी शेख अरबाज रफिक कुरेशी (20) रा. अमराई वार्ड घुग्घुस व अजय बालाजी दुर्योधन (19) रा. अमराई वार्ड घुग्घुस यांना अटक केली.
दारू किंमत 50 हजार व वाहन किंमत 50 हजार असा एकूण 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाही पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सचिन बोरकर,मनोज धकाते, मंगेश निरंजने, निलेश तुमसरे, मनोहर धारणे यांनी केली.
पुढील तपास उप पोलीस निरीक्षक किशोर मानकर करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »