ताज्या घडामोडी

शिरूर अनंतपाळ शहराचा विकास गतीने करू -चंद्रकांत खैरे

८०% समाजकारण व २० % राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या पाठीमागे उभे रहा – माजी खा. चंद्रकांत दादा खैरे

बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819

महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री व शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यशस्वीपणे कार्य करीत असून विरोधकांच्या टिकेला उत्तर न देता समाजहित डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्यांचा विकास व प्रासंगीक निर्माण होणाऱ्या कोरोना सारख्या अडचणीला मोठ्या धैर्याने सामना करत आहेत. तसेच शिवसेनेच्या वतीने ८० % समाजकारण व २०% राजकारण होत असल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी नगर पंचायत निवडणुका संदर्भात शिरूर अनंतपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मोळाव्या प्रसंगी बोलतांना दिले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव मामा चाळक, शिवसेनेचे जेष्ठ नेते लिंबन महाराज रेशमे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी जिल्हा प्रमुख पप्पुभाई कुलकर्णी, कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस शिवाजी माने, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, महिला जिल्हा संघटक डॉ. शोभाताई बेंजरगे, सुनिताताई चाळक, निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे, औसा ता.प्र. सतिष शिंदे, लातूर ता.प्र. बाबुराव शेळके, प्रा. सोमनाथ स्वामी डिगोळकर, शिरूर अनंतपाळ ता.प्र. भागवत वंगे, शहर प्रमुख सतिष शिवने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी खा. खैरे म्हणाले की, शि अनंतपाळ तालुका हा शिवसेना सरकार काळात निर्माण झालेला असून आता महाविकास आघाडीचे शासन असून मुख्यमंत्री हे शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे या नगराचा विकास साधावयाचा झाल्यास शिवसेनेच्याच पाठीमागे मताची शक्ती उभी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. सर्वसामान्यांची, गोरगरीबांची व शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहावे, असे स्पष्ट करून करोना काळात राज्य सरकार व शिवसैनिकांनी जनसामान्यांसाठी निष्ठेने कार्य केलेले असन त्यामुळेच करोना हा हद्दपार होत आहे. या पक्षाकडे पैसा नाही पण सर्वसामान्याची व्यथा जाणून घेऊन ती सोडविण्याची किमया व धमक आहे. भाजपा पक्ष हा जनतेला पैसे देऊन मते घेतो व निवडून आल्यानंतर सर्व शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी पैसे मागतो. याची जाण सर्व जनतेने ठेवणे गरजेचे आहे. पैशातून राजकारण करता येते पण समाजकारण व विकासाची कामे होत नाहीत. याबाबीची माहिती शिवसैनिकांनी जनतेला द्यावी. मागील नगर पंचायत निवडणूकीत शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले व इतर नगरसेवक कमी मताने पडलेले आहेत. परंतु यापुढे होणाऱ्या निवडणुकीत नगर पंचायत ही शिवसेनेच्याच ताव्यात आणण्यासाठी शिवसैनिकांनी परिश्रम करावे, असे शेवटी बोलतांना नमद केले.
या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व महिला जिल्हा संघटक डॉ. शोभाताई बेंजरगे यांनी पक्ष कार्याची माहिती यावेळी विषद केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका प्रमुख भागवत वंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिरूर अनंतपाळ शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »