ताज्या घडामोडी

अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. शशिकांत दारोळे यांचे आमरण उपोषण

अहमदनगर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

संगमनेरात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय शशिकांत दारोळे आमरण उपोषणास बसले होते दहा तारखेपासून मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण चालणार होते असे त्यांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण स्थळावरून सांगितले. संगमनेर तालुक्यातील गंगामाई घाट परिसर, कासारा दुमाला, खांडगाव, मंगळापुर, धांदरफळ, चिखली, वाघापूर, फादर वाडी, राजापूर, ढोलेवाडी, गुंजाळवाडी, साकुर, मांडवे, कोठे, चिखलठाण, घारगाव इत्यादी गावांमधून अवैधरित्या वाळू उपसा अनेक वर्षांपासून सुरू आहे या प्रश्नाबाबत उपोषण करते यांनी माननीय जिल्हाधिकारी प्रांताधिकारी, तहसीलदार, संगमनेर पोलीस स्टेशन यांना वेळोवेळी पत्र देऊनही ते दखल घेत नाहीत, त्यांच्या मते प्रशासन व वाळूमाफिया यांचे मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच वाळू माफियांवर कारवाई होताना दिसत नाही व वाळूमाफिया राजरोसपणे कोणालाच न जुमानता 24 तास अवैधरित्या वाळू उपसा करत आहेत. वाळू उपसा करताना ते गुंडागर्दी, दमदाटी करणे, वाळूचा ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवत सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. उपोषण करते श्री शशिकांत दारोळे यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे

★ संगमनेर तालुक्यात चालणारा अवैध वाळू उपसा त्वरित कायमस्वरूपी बंद करण्यात यावा.

★ वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी.

★ अवैधरित्या वाळू वाहतुकीसाठी वापरात येणारी वाहने ट्रॅक्टर डंपर पिकप जप्त करून ती स्कॅp करण्यात यावी.

★ वाहन चालक व मालक यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

★ जे प्रशासकीय अधिकारी वाळू माफियांना पाठीशी घालून त्यांच्यावर कार्यवाही करीत नाहीत अशा लाचखोर अधिकाऱ्यांना वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

★ नदीकाठची जमीन मालक वाळूचोरी सहकार्य करतात अशा जमीन मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
या सर्व मागण्या मान्य करत लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे शशिकांत दारोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे परंतु वाळू तस्करी करणाऱ्या वर कारवाई झाली नाही तर पुढील अहमदनगर जिल्हा कलेक्टर कार्यालया समोर उपोषण करणार असल्याचे शशिकांत दारोळे यांनी सांगितले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »