ताज्या घडामोडी

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

सुरेश सरतापे
जिल्हा प्रतिनिधि मुंबई
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8928834092

मुंबई : (प्रबोधिनी न्युज नेटवर्क) सध्या महाराष्ट्रात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळातील व्यक्ती अनेक तर्कवितर्क ही लावत आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली आहे.

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी”
2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी”

“नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी;
“मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी ?

अशी कविता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हणत प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते.मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते,तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही, त्या राज्यांत ही भाजपला विजय मिळालेला आहे, असे आठवले म्हणाले.
विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »