ताज्या घडामोडीशैक्षणिक

गणपती विसर्जन स्थळी योग्य बंदोबस्त करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल

लखन मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क चंद्रपूर
९३७३८६२७२७

मुल येथील गणपती स्थळी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे निष्पाप भक्तांचा नाहक बळी गेला. सदर ठिकाणी अपु-या सुविधा उपलब्ध असल्याने वेळीच मदत मीळु शकली नाही त्यामुळे इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्या इसमाला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मीळावी व विसर्जन स्थळी बंदोबस्त वाढविण्यात यावी या करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.
विसर्जन स्थळी पाण्याची खोली १५ ते विस फुट आहे. त्यामुळे चुकुन एखादी घटना घडू शकते. परंतु तीथे प्रशासना तर्फे केलेल्या उपाय योजना या अपु-या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तीथे बचाव दल, पोहनपटु व सुरक्षा रक्षक यांची तीथे नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सोनल मडावी यांनी केली आहे
सदर निवेदन देते वेळी गंगाधर कुनघाडकर, तालुका अध्यक्ष मुल, निताताई गेडाम, महीला ता अध्यक्ष, अर्चना ताई चावरे शहर अध्यक्ष, संदीप मेश्राम, ऊमेश नागोसे, राहुल बारसागडे, चंदन गुरनुले, विक्रम मडावी व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »