ताज्या घडामोडीशैक्षणिक

कोव्हीड-१९ मुळे थांबललेला घरकुल योजनेचा प्रश्न निकाली काढण्याकरीता मुख्याधिकारी यांचा

कोविड 19 मुळे अहेरी नगर पंचायतीचे घरकुल रखडलेल्या होते.

आशिष सुनतकर
तालुका प्रतिनिधी,
अहेरी

अहेरी :- नगरपंचायत अंतर्गत म्हाडा तर्फे राबवल्या जाणा-या घकुल योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय सनियंत्रण समितीच्या ४९ व्या मीटिंग मधे मंजुर झालेला होता. परंतु मार्च २०२० मधे नगरसेवक व काही नागरीकांनी सदर सविस्तर प्रकल्प अहवालावर मा नगराध्यक्षा व मा मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन सदर यादीत घोळ झाल्याचा आक्षेप घेतला होता व चौकशीची मागणी केली होती.
परंतु संपुर्ण भारतासह जगात कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले असता. नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी वर्ग कोवीड-१९ च्या अत्यावश्यक कामात गुंतलेला असल्याने सदर चौकशी करण्यासाठी उशीर झाला. परंतु शासनातर्फे कोवीड-१९ बाबत महाराष्ट्र अनलॉक टप्याटप्यामे होत असल्याने मा मुख्याधिकारी अजय महादेव साळवे यांना अहेरी नगर पंचायत चा कायमस्वरूपी पदभार मिळाल्याने सदर कामात तातडीने निर्णय घेवुन प्रश्न निकाली लावण्याचा पन घेतल्याचे दिसते.

कोड :- सदर योजना ही सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत असुन प्रत्येक पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेवु शकते सदर प्रकरणाची परीपुर्ण माहीती न घेता विविध समाज माध्यमावर पसरविण्यात येना-या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये असे नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले आहे.

कोड :- शासनाची योजना मुळातच सर्वांसाठि घरे या वाक्याने सुरवात होत असल्याने पसरविण्यात येणा-या अफवावर विश्वास ठेवू नये यामधे काही व्यक्ती समाजमाध्यमाद्वारा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या प्रकारचे राजकारण गलिच्छ आहे असे मला वाटते असे नगराध्यक्ष हर्षा ठाकरे यांनी सांगितले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »