ताज्या घडामोडीशैक्षणिक

रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा

शासनाचे आदेश : ग्रामपंचायतीमार्फत बजावणार नोटीस

आनंदराव ढोमणे
ब्रम्हपुरी प्रतिनिधी
भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतूकीला अडथळा निर्माण करनाऱ्यांना आता सावध व्हावे लागेल. कारण रस्त्यावर जनावरे बाधनाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत नोटिस बजावली जाणार असून दखल न घेतल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामीण नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते तयार केले ,मात्र काहीनी जनावरे बांधून वाहतूकीस अडथळा निर्माण केला आहे. सबधीताना ग्रामपंचायतनी नोटिस बजावल्यानंतरहि रस्त्यावर जनावरे बांधलीस तर आता फौजदारी कारवाईस तोंड द्यावे लागणार आहे. विदर्भात रस्त्यावर जनावरे बांधण्याची गावाची संख्या तीन हजारच्या जवळपास आहे. आता कार्यवाही करीता ग्रामपंचायत पुढाकार घेत आहे. केंद्र व राज्यशासनाच्यावतीने ग्रामीण भागातील सर्वागीण विकास करण्यात येतो. दहा वर्षांपुर्वी गाव रस्त्याची व्यवस्था अतिशय दयनीय होती. आज गल्लोगल्ली विविध योजनेतून काँक्रीट रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. परंतु या रस्त्याचा दूर उपयोग आता पशुपालक गाय, मैस,शेळी, बैल असे जानवर बांधण्याकरिता करीत असल्याचा तक्रारी शासन दरबारी आल्या आहेत. विशेष म्हणजे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खुठ्याला जनावरे बांधलेले असल्याने सकाळी व सायंकाळी चालने अवघड झाले आहे. अनेक वेळा या रस्त्यावर दुचाकी चालकाची अपघात झाल्याची तक्रारी प्रशासनाला झाल्या आहेत घराशेजारी जागा असतांनाही सिमेंट रस्त्यावर जनावरे बांधण्याचे प्रकार वाढले आहे. स्थानिक ललोकप्रतिनिधींना काही ग्रामस्थ जुमानत नसल्यामुळे हे अतिक्रमण वाढले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »