ताज्या घडामोडीशैक्षणिक

चंद्रपूर जिल्ह्यामधील भद्रावती तालुक्यातील गावामध्ये सी. आय. सी. आर. अंतर्गत

कु.किरण जाधव
मुख्य उपसंपादक
चंद्रपूर

भद्रावती-
ता. २८. ऑगस्ट. भद्रावती: भा. कृ. अनु. सं. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर तर्फे 2018 पासून “कीटक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन रणनीती तिचा प्रसार” केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्प चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्यातील पाटाळा, नगळोन, राळेगाव, माणगाव व थोराणा या गावांमध्ये राबवण्यात येत आहे या प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प समन्वय शास्त्रज्ञ (कीटक शास्त्रज्ञ) डॉक्टर. चिन्ना बाबू नाईक व सहसमन्वय शास्त्रज्ञ डॉक्टर. दीपक नगराळे (वनस्पती विकृतिशास्त्र) यांच्या मार्गर्शनाखाली यांचे वरिष्ठ संशोधक सहाय्यक मोहन नरोडे व सहाय्यक भूषण मुंजेकर यांनी शेतकऱ्यांना फेरोमोन ट्रॅप कसे लावावे यावरील प्रशिक्षण करून दाखवली. चालू कापुस हंगामात प्रकल्प कार्यान्वित झाला असून यामध्ये या गावात मधील ऐकून एकूण पन्नास लभार्ती आहेत. पीक हे ५०-५५ दिवसांचे आहे. सध्या तरी कुठेही गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नाही, परंतु पुढील १५-२० दिवसांनंतर कपाशीला बोंड लागण्यावेळी या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नियमित प्रक्षेत्र भेटी व चर्चा यांच्याद्वारे कामगंध सापळ्याच्या माध्यमातून निगराणी करणे व एकात्मिक नियंत्रण रणनीती अवलंबणे याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »