क्राइम

बबलू भैय्या हकीम यांच्या वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप

शुभेच्छांचाही वर्षाव

आशिष सुनतकर
प्रतिनिधी अहेरी

अहेरी :- बबलू भैय्या हकीम यांचे 21 आगष्ट शुक्रवार रोजी वाढदिवस होते त्या निमित्याने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम बबलू भैय्या हकीम यांची ज्येष्ठ कन्या डॉ.लुबना हकीम व कनिष्ठ कन्या सुझेन हकीम तसेच रुग्णालयातील अधिपरिचरिका यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले.
त्या नंतर नगर सेविका ममता पटवर्धन, नगरसेवक शैलेश पटवर्धन, रा.काँ. चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगर सेवक नितीन दोंतुलवार, निसार हकीम, अमान हकीम, मुक्तदीर शेख, महेश अलोने, मखमुर शेख, बाबू शेख, उमेर शेख, मुताहीर शेख आदींनी रुग्णांना फळे व बिस्कीट वितरित केले.
यावेळी सुरेंद्र अलोने, अनिकेत तोडसाम, शुभम झाडे, राहुल गर्गम, सोहेल शेख, प्रणय अलोने, आशिष अलोने, अन्सार अली, आफ्रिदी सैय्यद, आदी उपस्थित होते.
तसेच बबलू भैय्या हकीम हे नेहमी गोर गरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावत असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्षात भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केले व अनेकांनी वाढदिवसाचा केक कापायला लावून केक व मिठाईसुद्धा भरविले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »