ताज्या घडामोडीप्रबोधिनी न्युज विशेष

जि.प.शाळेच्या नवीन वर्ग खोलीची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

आशिष सुनतकर
तालुका प्रतिनिधी,
अहेरी

अहेरी : जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत आलापली येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ७ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१८-१९ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधीतून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले असल्याने अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली असून सदर उदघाटनला पंचायत समिती सदस्य राकेश तलाडे, माजी सरपंच सुगंदा मडावी, विजय कुसनाके, दिलीप गंजीवर, संतोष तोडसाम, विनोद अकंनपल्लीवार, सलीम भाई, प्रशांत गोडशेलवार, जुलेक शेख, प्रशांत मित्रावार, अमित येनपरेड्डीवार, आलापल्ली ग्रा.प.चे प्रशासक बनाईत, ग्रामसेविका गेडाम मॅडम, रमण गणजीवार, अनिल इसकापे तथा आविस जेस्ट कार्यकर्ते तथा गावकरी उपस्तीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »