क्राइम

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल फोन चा गैरवापर ; कारवाईची मागणी

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तहसीलदार यांना निवेदन

श्रीधर बोल्लूवार
राजुरा प्रतिनिधी

राजुरा /कोरोना या पाश्वभूमीवर नागरिकांची समस्या दिवसेे दिवस वाढत चाली आहे. आणि विध्यार्थ्यांना शिक्षण घेणे हे खूप कठीण झाले आहे. यात कॉन्व्हेंट शाळा ऑनलाईन चा माध्यमातून विध्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.

इयत्ता 1ली विध्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन शिक्षण देत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विध्यार्थी एकाग्रता ने शिक्षण घेत आहे का? ज्या वया मध्ये मोबाईल फोन चा उपोयग नाही करायला पाहिजे त्याच वयात ऑनलाईन शिक्षणामुळे उपयोग होत आहे.

मुलांच्या कोमल मनांचा कुठलाही विचार न करता, तसेच पालकांकडे मोबाईल ,लॅपटॉप, वेगळा घेण्याची ऐपत आहे की नाही याची खात्री न करताच, स्वेच्छेने ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत . खरंच मुलांना प्रत्यक्षात न शिकवता सर्व समजत असेल का? मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट आहे. निदान शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देतात.
ऑनलाईन शिक्षण चा गैरवापर करून जे नाही बघायचे तेच सर्व मुलं बघत आहेत , खरंच शिक्षण होत आहेका?
याचा सर्व शाळे ने आणि पालकांनी विचार करायला पाहिजे . त्यामुळे या सर्वांवर कुठेतरी अंकुश लागणे आवश्यक आहे.

त्यामुळे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल राजुरा कडून तहसीलदार, राजुरा यांना या प्रश्नाचा गंभीर पणे विचार करण्यासाठी तसेच योग्य कार्यवाही साठी एक निवेदन अर्ज देण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »