ताज्या घडामोडीप्रबोधिनी न्युज विशेष

गडचिरोली : वैनगंगा नदीकाठी पूरस्थिती; वडसा, आरमोरी, मार्कंडा, अहेरीसह सिरोंचा भागात सर्तकतेचा इशारा

आशिष सुनतकर
तालुका प्रतिनिधी,
अहेरी

गडचिरोली : गोसेखुर्द धरणामधून वेळोवेळी सोडण्यात येणारे अधिकच्या विसर्गामुळे काल सकाळी ८ वा. गोसेखुर्द धरणाच्या २३ गेटमधून २७९८८ क्यूमेक्स एवढा विसर्ग सुरू आहे. तसेच पुढे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता वैनगंगा नदीकिनारी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी अशा सुचना प्रशासनकडून देण्यात येत आहेत. वैनगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे उपनद्या व नाल्यांमध्ये बॅकवाटर मुळे अंतर्गत व मुख्य रस्ते बंद होण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक ठिकाणी बॅरेकेडींग पोलीस विभागाकडून लावण्याचे कार्य सुरू आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता सर्व तहसिलदार व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नदीकिनारी भागात वेळोवेळी अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. वैनगंगा व उपनद्यांच्या नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी नदीकिनारी जाणे टाळावे. सेल्फीचा मोह करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणत्याही प्रकारे पुल ओलांडू नये याबाबत सर्व स्तरावर सतर्क बाळगावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या अधिक विसर्गामूळे जिल्हयातील पाच प्रमुख मार्ग बंद

1. गडचिरोलीहून नागपूरकडे जाणारा आरमोरी जवळील पाल व गाढवी नदीच्या पुलावर पाणी
2. गडचिरोली ते चामोर्शी यात शिवणी व गोविंदपूर नाला
3. आरमोरी ते रामदा रस्ता- गाढवी नदीवरील पूल
4. आष्टी गोंडपिंपरी रस्ता
5. आरमोरी ते ब्रह्मपुरी रस्ता
6. अहेरी – व्यंकटापूर (गडअहेरी नाला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »