ताज्या घडामोडीप्रबोधिनी न्युज विशेष

वरोरा तालुक्यातील चिकणी या गावामध्ये सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

शब्बर थैंम
तालुका प्रतिनिधी,
वरोरा

वरोरा :- तालुक्यातील चिकणी गावात शेत
शिवारात सततच्या पावसामुळे सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पूर्वीच अडचणीत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. चिकणी या गावातील
शेतकरी सुनील खापणे व पत्रुजी खोके यांनी आपल्या शेतातील नुकसान कशाप्रकारे झाले आहे, हे त्यांनी छायाचित्रा द्वारे दाखविले आहे. सुनील खापणे यांच्या शेतात ढगाळ
वातवरणामुळे होणारा रोगाचा प्रादुर्भाव हा सोयाबीन पिकावर झाला असून 2.5 एकर मध्ये असलेले सोयाबीनच्या पिकांचे लष्करी अळीमुळे नुकसान झाले आहे. यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाला. त्यामुळे शिवारात पिके बहरु
लागली. मात्र, ऐन फुलोऱ्याच्याअवस्थेत पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापूस, सोयाबीन पिकांची पातीगळ होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे
नवे संकट उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यापासून सतत पावसामुळे शेत शिवारात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सोयाबीन पिकांवर लष्करी अळीचा
प्रादुर्भाव वाढत असल्यान सोयाबीन पिकाला देठ फांद्या व पानेच शिल्लक राहिले आहेत. यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची सततधार सुरू होती. या
पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाऱ्या पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर अळीचा
प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या पावसाने शेतातील कामे
थाबली. पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढला अति ओलावा आल्याने आता पिकही पिवळी पडायला लागले आहे.
दहा दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे पाऊसही पाठ सोडतांना दिसत नाही. पाऊस सुरू असल्याने कोणत्याही उपाययोजना करणे शक्य नसल्याने शेतकरी मोठया अडचणीत पडला आहे. पावसाची झड सुरूच राहिली तर सोयाबीन व कपाशीचे मोठेनुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनकडून वर्तवली जात आहे . रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने तातडीने लक्ष द्यावे व मागर्दशन करावे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »