बॉलीवुड

पुराच्या पाण्यात शेतकरी गेला वाहून

आशिष सुनतकर
प्रतिनिधी अहेरी

अहेरी:- शेतीचे काम करून घरी परत येत असताना तुडुंब भरलेल्या नाल्यात शेतकरी वाहून गेल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली.आज सकाळी त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात आढळून आला. नरेश सिंगा सडमेक वय अंदाजे 35 असे मृतक शेतकर्याचे नाव असून तो अर्कापल्ली येथील रहिवासी आहे.
वेडमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अर्कापल्ली येथील दोन टोल्याच्या मधोमध एक नाला वाहतो.सध्या जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.काल दि.19 ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातील काम करून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत आपल्या घरी परत येत असताना नरेश सिंगा सडमेक नावाचा शेतकरी वाहून गेला.घरी परत न आल्याने गावातील नागरिकांनी शोध घेतला रात्रीची वेळ असल्याने काहीच थांगपत्ता लागला नाही.आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविल्यावर त्या शेतकऱ्याचा मृतदेहच आढळून आला.
याची माहिती मिळताच कमलापूर चे तलाठी आर.एम. टेकाम यांनी अर्कापल्ली गाव गाठून मोका पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदन साठी अहेरी ला पाठविल्याची माहिती मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम यांनी दिली.
नरेश सिंगा सडमेक यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असून घरचा कमावता व्यक्ती गेल्याने त्यांच्यावर खूप मोठे संकट कोसडले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »