बॉलीवुड

रस्ते व पुलांसाठी 515 कोटींची तरतूद!

लवकरच कामांना सुरुवात होणार- आ.धर्मराव बाबा आत्राम यांची माहीती

आशिष सुनतकर
प्रतिनिधी अहेरी

अहेरी:- सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली, गडचिरोली व सिरोंचा विभागाअंतर्गत 515.20 कोटींचे रस्ते व पुलांसाठी निधीची तरतूद झाली असून लवकरच कामांना प्रारंभ होणार अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली.
यात रस्त्यांसाठी 230 कोटी 76 लाख 11 हजार खर्चिक करून रस्ते तर उर्वरित मोठे व लहान पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
यात सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत अहेरी, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील रस्त्यांवरील लहान-मोठे पुलांच्या व रस्त्याचे बांधकाम होणार असून रस्त्यांमध्ये अहेरी तालुक्यातील कंदोळी, पेरमिली, येरमणार, कोडसेपल्ली, दामरंचा, कोरेपल्ली, कापेवंचा, नैनेर, भामरागड तालुक्यातील हेमलकसा, कारमपल्ली, कियेर, हलवेर, सुरजागड रस्ता, जारावंडी, इरपणार ते राज्य मार्ग तसेच तोडसा ते सुरजागड रस्ता, गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, पेंढरी ते राज्य सीमा रस्ता, कसनसुर, घोटसुर, उडेरा, तुमरगुंडा रस्ता, पर्सलगुंदी, रेकणार, झारेवडा गट्टा रस्ता, कसनसुर, हेटलकसा, जवेली रस्ता आदी विविध रस्ते होणार आहेत
पुलांमध्ये कंदोळी-दामरंचा रस्त्यावर, भामरागड तालुक्यातील बोटनफुंडी ते हलवेर रस्त्यावर, एटापल्ली तालुक्यातील गट्टा, गर्देवाडा, वागेतुरी पेंढरी रस्त्यावर, कासमपल्ली, उडेरा, तुमरगुंडा आदी रस्त्यांवर पुलांचे कामे होणार आहेत.
तर सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते रेगेगाव, गुरेकसा ते काटेझरी रस्ता, धानोरा, चव्हेला, मुंगेनार पेंढरी रस्ता तसेच मालेवाडा देवसुर रस्ता आणि मुरमाडी, गिलगाव, सोडे धानोरा, कण्हरटोला, टोडे, परवेल, कारवाफा रस्ता तर याच तालुक्यातील मालेवाडा ते देवसुर रस्त्यावर दोन ठिकाणी पुलांचे बांधकाम आहेत.
तर विशेष प्रकल्प विभाग सिरोंचा अंतर्गत रोमपल्ली, सिरकोंडा माल, झिंगाणूर कोपेला रस्ता बांधकाम करणे आहे. बहुतांश कामे ही डावी कडवी विचारसरणीग्रस्त भागासाठी असलेल्या विशेष निधीतून केली जाणार आहेत. एकंदरीत सर्व कामे मिळून 515.20 कोटींचे रस्ते व पुलांसाठी निधीची तरतूद झाली असुन निविदा प्रक्रियेची प्रक्रिया सुरू आहे.
पावसाळा व लॉक डाऊनची परिस्थिती सुधारताच सदर कामांना वेग येण्याची शक्यता असून तालुका व जिल्हा मुख्यालयाशी अखंडितपणे संपर्क कायमचे टिकून राहण्यासाठी सदर रस्ते व पुलांचे कामे तात्काळ व्हावे यासाठी आणि अजून नाविन्यपूर्ण कामे राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकात नमूद केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »