बॉलीवुड

अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आ.धर्मराव बाबा आत्राम यांची अकस्मात भेट!

रुग्णालयातील विविध वार्डात प्रत्यक्षात पाहणी रुग्णांची व नातेवाईकांची आस्थेने विचारपूसही

अन्सार अली
विशेष तालुका प्रतिनिधी, अहेरी
9579303420

अहेरी :- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सोमवार 24 आगष्ट रोजी सकाळी 9:15 वाजता अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात अकस्मात भेट देऊन रुग्णालयातील विविध वार्डात प्रत्यक्ष पाहणी केले व रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांचीही आस्थेने विचारपूस केले.
अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात अकस्मात भेट देऊन रुग्णांना योग्य सेवा मिळत आहेत की नाही याबद्दलची माहिती जाणून घेतले व विविध पदे रिक्त असल्याने ती पदे तात्काळ भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून समस्या निकाली काढणार असल्याचे बोलले.
तसेच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रवींद्र वाटोर आणि वैद्यकीय चम्मू सोबत चर्चा करून अहेरी उपविभागातील नागरिक दुर्गम भागातील व गोर-गरीब असल्याने रुग्णांवर योग्य उपचार व सेवा पुरविण्यात यावे सोबतच रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांची गैरसोयी होऊ नये याकडेही कटाक्षाने लक्ष पुरवावे असे सांगून ज्यांची ज्या वेळची ड्युटी असते त्यांनी चोख व प्रामाणिकपणे वेळेवर हजर राहून सेवा पुरविण्याचे निर्देश दिले.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या अकस्मात दिलेल्या भेटी दरम्यान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत ज्येष्ठ नेते बबलू भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, जि. प.सदस्य ऋषी पोरतेट उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »