बॉलीवुड

बबलू हकीम यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान! इंडियन फ़ंक्शन पॅलेस येथे येथे रक्तदान शिबीर व बबलू हकीम यांच्या वाढदिवसाचा साजरा

अन्सार अली
विशेष तालुका प्रतिनिधी, अहेरी
9579303420

अहेरी:- वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम यांचे शुक्रवार 21 आगष्ट रोजी वाढदिवस होते, वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार 23 आगष्ट रोजी येथील इंडियन फ़ंक्शन पॅलेस मध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. विशेष म्हणजे बबलू भैय्या हकीम यांच्या वाढदिवसाचा केकही यावेळी कापण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी फित कापून केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम , युवा नेते ऋतुराज हलगेकर, बबलू भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन भाभी हकीम, डॉ.लुबना हकीम, पूर्वाताई दोंतुलवार, ममता पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तामुळे दुसऱ्याचे जीव वाचविता येते त्यामुळे रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घ्यावे आणि रक्तदानाचे शिबिर वेळोवेळी राबविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून बबलू हकीम व शाहीन हकीम यांच्या सामाजिक व स्तुत्यप्रिय उपक्रमाचे प्रशंसा केले.
रक्तदान शैलेश पटवर्धन, सरफराज आलम, कपिल झाडे, सतीश चांदेकर, धीरज तुलसीगिरवार, भारत झाडे, वैभव रामपल्लीवार, अमजद खान पठाण, समीर सैय्यद, सुमित मोतकूलवार, पवन रामगिरवार, अजहर चाऊस,रितेश रामटेके, शायरअली सैय्यद, राहुल वाघाडे, उमेर शेख, राहुल अनमलवार, अक्षय अनमलवार, मोहम्मद मुताहीर शेख, विनोद भुरसे, योगेश दंडिकवार, अनिकेत तोडसाम, मोहम्मद शेख आदी युवकांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासाठी डॉ. प्रतिभा पेंदोर, सरिता वाघ, शिरीन कुरेशी, रश्मी मारगोनवार, वाहन चालक मना शेख आदी वैद्यकीय चम्मूनी सहकार्य केले.
तर रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी डॉ.लुबना हकीम, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने,प्रतीक मुधोळकर,नितीन पटवर्धन, बाबू शेख, नफि पठाण, सोहेल शेख आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी मुक्तदिर शेख, महेश अलोने, अफसर खान पठाण, कपिल ढोलगे, उमेर शेख, इरफान शेख, राहुल गर्गम, अन्सार अली, आफ्रिदी सैय्यद, प्रणय अलोने,नरेश सुरपाम, विनोद कोसरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »