ताज्या घडामोडीराजकीय

पाच वर्षा खालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही – (W.H.O.)

अजिंक्य कांबळे
मुंबई प्रतिनिधी

मुंबई – जगभरात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) लहान मुलांबाबतच्या नियमावलीत सुधारणा केली आहे. डब्लूएचओनुसार, पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही. कमीतकमी मदतीने मास्क घालण्याची मुलांची क्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेताना इतरही अनेक गोष्टींचा विचार केला, जसे की लहान मुलांची सुरक्षितता आणि आरोग्य. त्याशिवाय ६ ते ११ वर्ष वयोगटातील मुलांसाठी डब्लूएचओने वेगळे नियम बनवले आहेत. या वयोगटातील मुलं जर त्या क्षेत्रातून येत असतील जिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तरच त्यांना मास्क घालण्याची गरज आहे.

यामध्ये मुलांच्या मास्क घालण्याची क्षमता, मोठ्यांची काळजी आणि मास्क घालण्याच्या संभाव्य प्रभावांबद्दल विचार करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, १२ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य असेल आणि प्रौढांसाठी सध्या असलेल्या गाईडलाईन्सच लागू असतील.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »