ताज्या घडामोडी

वाकदकर दाम्पत्याची निरंतर वैद्यकीय सेवा सुरु


पंकज रामटेके
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
८४८४९८८३५५

घुग्घुस- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉ. परमेश्वर वाकदकर आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना वाकदकर मागिल मार्च 2020 पासुन सतत कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवा निरंतर देत आहेत. वाकदकर दाम्पत्याची तीन वर्षं ची मुलगी. कु. ईश्वरी वाकदकर हि पण सोबत असते.
त्यांच्या घरी त्यांच्या लहान मुलीचा सांभाळ करण्यासाठी कुणीही नसल्यामुळें नाईलाजाने कधी ती प्राथमिक आरोग्य केंद्रात आई वडिलांन सोबत असते.
तर कधी घर मालका कडे तिला ठेवून वाकदकर दाम्पत्य निरंतर आरोग्य सेवा घुग्घुस परिसरात देत आहे. मागील ऑक्टोंबर महिन्यात संपूर्ण वाकदकर कुटुंबाला कोरोणाची लागणं झाल्या मुळे भर्ती करण्यात आले होते.
वाकदकर कुटुंबियांनी कोरोनावर मात करून नंतर लगेच आपल्या कर्तव्यावर हजर राहावे लागले. आणि सध्या या कोरोना महामारीच्या काळात ही हे वाकदकर दाम्पत्य कर्यारत आहेत.
जागतिक मातृदिना निमित्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना वाकदकर यांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »